मुख्यपृष्ठ
मुख्य पान (Home)मागेBola RokhthokBola Rokhthok
मुख्य पानमहाराष्ट्रahilyanagar
महाराष्ट्रजामखेड
18 वाचक वाचत आहेत

आक्षेपार्ह स्टेटस भोवले; मनोज जरांगे पाटील यांच्या अवमानाच्या आरोपाखाली तरुण ताब्यात..!

बो
संपादक गिरीधर जगताप
बोला रोखठोक ब्युरो
रविवार, १३ सप्टेंबर, २०२६·०१:५१ PM·2 मिनिटे वाचन
आक्षेपार्ह स्टेटस भोवले; मनोज जरांगे पाटील यांच्या अवमानाच्या आरोपाखाली तरुण ताब्यात..!
📷फोटो सौजन्य: संपादक गिरीधर जगतापप्रतिनिधिक छायाचित्र

ठळक महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights)

मनोज जरांगे पाटील यांचा कथितरीत्या आक्षेपार्ह फोटो तयार करून सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याच्या आरोपावरून एका तरुणाविरुद्ध खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्टेटसमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नायगाव येथील नागरिकांनी संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 159/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 353(5) व 356 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

✓ तथ्य पडताळणीकृत बातमी (Fact Checked)

बोला रोखठोक संपादकीय पथकाद्वारे पडताळणी केली.

जामखेड (खर्डा) : मराठा समाजाच्या भावना दुखावतील, अशा आशयाचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवल्याच्या आरोपावरून खर्डा पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी विठ्ठल तोंडे, रा. सतेवाडी, पोस्ट नायगाव, ता. जामखेड यांनी आपल्या मोबाईलवरून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून मनोज जरांगे पाटील यांचा कथितरीत्या आक्षेपार्ह फोटो तयार करून तो सोशल मीडियावरील स्टेटसला ठेवल्याचा आरोप आहे. या स्टेटसमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच संबंधित स्टेटसनंतर एक संदेश प्रसारित करण्यात आल्याची माहिती असून, त्याबाबत नायगाव येथील काही नागरिकांनी संबंधित व्यक्तीला आक्षेप घेतल्याचे सांगितले. मात्र, संबंधित व्यक्तीने स्टेटस हटविले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील संभाषणाची ध्वनिमुद्रिका असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी नायगाव येथील मराठा समाजातील सुमारे 40 ते 50 युवक व नागरिकांनी खर्डा पोलीस ठाण्यात येऊन संबंधित व्यक्तीवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध खर्डा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 159/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 353(5) आणि 356 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी पथक रवाना केले. पथकातील पोलीस हवालदार शेंडे व पोलीस कर्मचारी म्हस्के यांनी संबंधित आरोपीला जामखेड परिसरातून 24 तासांच्या आत ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरसागर करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर तसेच पोलीस कर्मचारी संभाजी शेंडे, संदीप धामने आणि शशी म्हस्के यांनी केली.

टॅग्ज:#महाराष्ट्र#ताज्या घडामोडी

ही बातमी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा!

सत्य व पडताळणी झालेल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा

या बातमीवर आपली प्रतिक्रिया नोंदवा:

मागील बातमीदिशा सालियान मृत्यू प्रकरणात CBI ची FIR; अनेकांच्या भूमिकेची होणार चौकशी!पुढील बातमी मुंबईकडे मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार; आंदोलनाचा ‘रोड मॅप’ तयार!

वाचकांच्या प्रतिक्रिया (0)

पहिली प्रतिक्रिया द्या आणि या चर्चेत सहभागी व्हा!

आणखी महत्त्वाच्या घडामोडी

सर्व पहा →
सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!

सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!

📍 बारामतीवाचा →
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

📍 शिर्डीवाचा →
अ‍ॅड. अजित तापकीर यांची फौजदारी कायद्यात एलएल.एम. पदवीला गवसणी!

अ‍ॅड. अजित तापकीर यांची फौजदारी कायद्यात एलएल.एम. पदवीला गवसणी!

📍 पुणेवाचा →
गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!

गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!

📍 गोवावाचा →
MPSC राज्यसेवा परीक्षा २०२६: नवीन परीक्षा पद्धती आणि हॉल तिकीट अपडेट; उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना

MPSC राज्यसेवा परीक्षा २०२६: नवीन परीक्षा पद्धती आणि हॉल तिकीट अपडेट; उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना

📍 पुणे / मुंबईवाचा →
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पुढील हप्त्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; त्वरित करा ही कामे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पुढील हप्त्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; त्वरित करा ही कामे

📍 मुंबई / पुणेवाचा →
बोला रोखठोक लोगो

बोला रोखठोक

महाराष्ट्राचे ६०-शब्दांतील डिजिटल बातमीपत्र

WhatsApp ग्रुप२५k+

ताजी ब्रेकिंग थेट मिळवा

ग्रुप जॉईन करा →

मराठी बातम्या

  • 🚩महाराष्ट्र
  • 🏛️राजकारण
  • 🚨गुन्हेगारी
  • 📈बाजार व शेअर्स
  • 🎓शिक्षण व भरती
  • 💼नोकरी संदर्भ
  • 📄शासकीय योजना
  • 🏆क्रीडा जगत
  • 🎬मनोरंजन

प्रमुख जिल्हे

  • 🏰पुणे शहर
  • 🏭पिंपरी-चिंचवड
  • 🏙️मुंबई व ठाणे
  • 🏛️छ. संभाजीनगर
  • 🍊नागपूर
  • 🍇नाशिक
  • 🚩कोल्हापूर
  • 🕌अहिल्यानगर
  • ☀️सोलापूर
  • 👑सातारा

विशेष विभाग

  • ⚡६०-शब्दांत बातम्या
  • 📄शासकीय GR सोपी भाषा
  • 📰डिजिटल ई-पेपर
  • 🎬इन्स्टाग्राम रील्स
  • 🔴थेट प्रक्षेपण (Live)
  • 📺व्हिडिओ बुलेटिन
  • 🔖जतन केलेल्या बातम्या
  • 🔍शोध इंजिन (Search)

कार्यालय व संपर्क

📍 सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता, पुणे, महाराष्ट्र - ४११०३०.

✉️ bolarokhthok@gmail.com

सोशल मीडियावर फॉलो करा:

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे (All Maharashtra Districts)

३६ जिल्हे • थेट ६०-शब्दांतील बातम्या
🏰पुणे शहर🏭पिंपरी-चिंचवड👑सातारा🍇सांगली🚩कोल्हापूर☀️सोलापूर🌾बारामती🏔️मावळ🏞️हवेली🏙️मुंबई शहर🌆मुंबई उपनगर🏢ठाणे🌴पालघर⚓रायगड / नवी मुंबई🥭रत्नागिरी🌊सिंधुदुर्ग🍇नाशिक🕌अहिल्यानगर (अहमदनगर)🍌जळगाव🏞️धुळे🌄नंदुरबार🏛️छत्रपती संभाजीनगर⛩️धाराशिव (उस्मानाबाद)🌾जालना🎯बीड📚लातूर☬नांदेड🌱परभणी🌿हिंगोली🍊नागपूर🌳अमरावती🌾अकोला🚜यवतमाळ🕊️वर्धा🏞️बुलढाणा🌾वाशिम🌊भंडारा🌲गोंदिया🐯चंद्रपूर🎋गडचिरोली
जाहिरात व ब्रँड प्रमोशन•Brand Ads

ADVERTISE, BE REMEMBERED!

तुमच्या ब्रँड, व्यवसाय किंवा उपक्रमाची माहिती पोहोचवा थेट महाराष्ट्रातील लाखो वाचकांपर्यंत. डिजिटल बॅनर, प्रायोजित बातमी आणि सोशल मीडिया मोहिमेसाठी आजच संपर्क करा.

५०,०००+
मासिक वाचक
डिजिटल प्रेक्षक
३६ जिल्हे
सर्व जिल्हे
महाराष्ट्र कव्हरेज
२५k+
व्हॉट्सॲप वाचक
थेट कम्युनिटी
६०-शब्दांत प्रायोजित बातमीजिल्हास्तरीय टार्गेटिंगव्हॉट्सॲप ब्रॉडकास्टहाय-इम्पॅक्ट बॅनर
WhatsApp वर संपर्क करा
ईमेल पाठवा
आमच्याबद्दल•संपर्क•प्रायव्हसी पॉलिसी•अटी व शर्ती•अस्वीकरण•Sitemap•News Sitemap

© २०२६ बोला रोखठोक डिजिटल मीडिया. सर्व हक्क सुरक्षित.