मुख्यपृष्ठ
मुख्य पान (Home)मागेBola RokhthokBola Rokhthok
मुख्य पानमहाराष्ट्रahilyanagar
महाराष्ट्रकर्जत
273 वाचक वाचत आहेत

कर्जतचा प्रारूप विकास आराखडा रद्द करा; नितीन तोरडमलांची मागणी!

बो
प्रतिनिधी अमोल घालमे
बोला रोखठोक ब्युरो
बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६·०८:२९ AM·1 मिनिटे वाचन
कर्जतचा प्रारूप विकास आराखडा रद्द करा; नितीन तोरडमलांची मागणी!
📷फोटो सौजन्य: प्रतिनिधी अमोल घालमेप्रतिनिधिक छायाचित्र

ठळक महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights)

कर्जतचा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याची मागणी नव्याने विकास आराखडा तयार करण्याची नितीन तोरडमलांची मागणी शेतकरी, व्यापारी व उद्योजकांना विश्वासात घेण्याची मागणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आरक्षणाची मागणी

✓ तथ्य पडताळणीकृत बातमी (Fact Checked)

बोला रोखठोक संपादकीय पथकाद्वारे पडताळणी केली.

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीचा तयार करण्यात आलेला “प्रारूप विकास आराखडा” रद्द करून नव्याने विकास आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे कर्जत तालुकाप्रमुख नितीन लता ईश्वर तोरडमल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्याची “प्रादेशिक योजना” २००४-०५ साली मंजूर होऊन अंमलात आलेली आहे. या प्रादेशिक योजनेमध्ये कर्जत शहरालगतचे रहिवासी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र, सध्या तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये हे क्षेत्र वाढविण्यात आलेले नाही, असा आक्षेप निवेदनातून घेण्यात आला आहे. तसेच प्रारूप विकास आराखडा तयार करताना भागधारकांचा (Stakeholders) विचार करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्जतचे मुख्याधिकारी आणि नगरसेवकांना याबाबत कल्पना देण्यात आली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलांसाठीच्या शासकीय वसतिगृहासाठी आवश्यक असलेले शासकीय आरक्षण विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. कर्जत शहराच्या दक्षिण भागातील काही क्षेत्र रहिवासी विभागात वाढविण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या पद्धतीने कोणाचाही विश्वासात न घेता प्रारूप विकास आराखडा तयार केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचा आरोप नितीन तोरडमल यांनी केला आहे. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीचा सध्याचा प्रारूप विकास आराखडा रद्द करावा आणि त्यानंतर नव्याने विकास आराखडा तयार करताना शहरातील व्यापारी, उद्योजक तसेच संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती संचालक, नगररचना मध्यवर्ती इमारत, पुणे; सहसंचालक, नगररचना, अहिल्यानगर आणि मुख्याधिकारी, कर्जत नगरपंचायत यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्ज:#महाराष्ट्र#ताज्या घडामोडी

ही बातमी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा!

सत्य व पडताळणी झालेल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा

या बातमीवर आपली प्रतिक्रिया नोंदवा:

मागील बातमीपीएम किसान सन्मान निधी योजना: १९ वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार! शेतकऱ्यांनी लगेच तपासा e-KYC स्टेटसपुढील बातमी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा द्या; नियम-कायद्यांचे कारण सांगून गैरसमज पसरवू नका! -पालकमंत्री राधाकृष्ण विखे

वाचकांच्या प्रतिक्रिया (0)

पहिली प्रतिक्रिया द्या आणि या चर्चेत सहभागी व्हा!

आणखी महत्त्वाच्या घडामोडी

सर्व पहा →
भाजप गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज वैध; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा!

भाजप गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज वैध; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा!

📍 सांगलीवाचा →
राजेंद्र माने यांना जामीन मंजूर; प्रवीण ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला!

राजेंद्र माने यांना जामीन मंजूर; प्रवीण ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला!

📍 कर्जतवाचा →
सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!

सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!

📍 बारामतीवाचा →
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

📍 शिर्डीवाचा →
अ‍ॅड. अजित तापकीर यांची फौजदारी कायद्यात एलएल.एम. पदवीला गवसणी!

अ‍ॅड. अजित तापकीर यांची फौजदारी कायद्यात एलएल.एम. पदवीला गवसणी!

📍 पुणेवाचा →
गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!

गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!

📍 गोवावाचा →
बोला रोखठोक लोगो

बोला रोखठोक

महाराष्ट्राचे ६०-शब्दांतील डिजिटल बातमीपत्र

WhatsApp ग्रुप२५k+

ताजी ब्रेकिंग थेट मिळवा

ग्रुप जॉईन करा →

मराठी बातम्या

  • 🚩महाराष्ट्र
  • 🏛️राजकारण
  • 🚨गुन्हेगारी
  • 📈बाजार व शेअर्स
  • 🎓शिक्षण व भरती
  • 💼नोकरी संदर्भ
  • 📄शासकीय योजना
  • 🏆क्रीडा जगत
  • 🎬मनोरंजन

प्रमुख जिल्हे

  • 🏰पुणे शहर
  • 🏭पिंपरी-चिंचवड
  • 🏙️मुंबई व ठाणे
  • 🏛️छ. संभाजीनगर
  • 🍊नागपूर
  • 🍇नाशिक
  • 🚩कोल्हापूर
  • 🕌अहिल्यानगर
  • ☀️सोलापूर
  • 👑सातारा

विशेष विभाग

  • ⚡६०-शब्दांत बातम्या
  • 📄शासकीय GR सोपी भाषा
  • 📰डिजिटल ई-पेपर
  • 🎬इन्स्टाग्राम रील्स
  • 🔴थेट प्रक्षेपण (Live)
  • 📺व्हिडिओ बुलेटिन
  • 🔖जतन केलेल्या बातम्या
  • 🔍शोध इंजिन (Search)

कार्यालय व संपर्क

📍 सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता, पुणे, महाराष्ट्र - ४११०३०.

✉️ bolarokhthok@gmail.com

सोशल मीडियावर फॉलो करा:

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे (All Maharashtra Districts)

३६ जिल्हे • थेट ६०-शब्दांतील बातम्या
🏰पुणे शहर🏭पिंपरी-चिंचवड👑सातारा🍇सांगली🚩कोल्हापूर☀️सोलापूर🌾बारामती🏔️मावळ🏞️हवेली🏙️मुंबई शहर🌆मुंबई उपनगर🏢ठाणे🌴पालघर⚓रायगड / नवी मुंबई🥭रत्नागिरी🌊सिंधुदुर्ग🍇नाशिक🕌अहिल्यानगर (अहमदनगर)🍌जळगाव🏞️धुळे🌄नंदुरबार🏛️छत्रपती संभाजीनगर⛩️धाराशिव (उस्मानाबाद)🌾जालना🎯बीड📚लातूर☬नांदेड🌱परभणी🌿हिंगोली🍊नागपूर🌳अमरावती🌾अकोला🚜यवतमाळ🕊️वर्धा🏞️बुलढाणा🌾वाशिम🌊भंडारा🌲गोंदिया🐯चंद्रपूर🎋गडचिरोली
जाहिरात व ब्रँड प्रमोशन•Brand Ads

ADVERTISE, BE REMEMBERED!

तुमच्या ब्रँड, व्यवसाय किंवा उपक्रमाची माहिती पोहोचवा थेट महाराष्ट्रातील लाखो वाचकांपर्यंत. डिजिटल बॅनर, प्रायोजित बातमी आणि सोशल मीडिया मोहिमेसाठी आजच संपर्क करा.

५०,०००+
मासिक वाचक
डिजिटल प्रेक्षक
३६ जिल्हे
सर्व जिल्हे
महाराष्ट्र कव्हरेज
२५k+
व्हॉट्सॲप वाचक
थेट कम्युनिटी
६०-शब्दांत प्रायोजित बातमीजिल्हास्तरीय टार्गेटिंगव्हॉट्सॲप ब्रॉडकास्टहाय-इम्पॅक्ट बॅनर
WhatsApp वर संपर्क करा
ईमेल पाठवा
आमच्याबद्दल•संपर्क•प्रायव्हसी पॉलिसी•अटी व शर्ती•अस्वीकरण•Sitemap•News Sitemap

© २०२६ बोला रोखठोक डिजिटल मीडिया. सर्व हक्क सुरक्षित.