गुंड कॉलनीचा राजा मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम; रक्तदान शिबिरात ५३ रक्तदात्यांचा सहभाग

ठळक महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights)
१)गुंड कॉलनीचा राजा मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर ५३ रक्तदात्यांचा सहभाग २)विघ्नहर्ता ब्लड बँकेच्या पथकाकडून रक्तसंकलन ३)गुंड कॉलनीतील नागरिक व तरुणांनी एकत्रितपणे गणपतीची स्थापना ४)गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम
बोला रोखठोक संपादकीय पथकाद्वारे पडताळणी केली.
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत शहरातील गुंड कॉलनीचा राजा मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील तरुणांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात विघ्नहर्ता ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्त संकलित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान केल्याने शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, गुंड कॉलनीतील सर्व नागरिकांनी एकत्रित येत गुंड कॉलनीचा राजा गणपतीची स्थापना केली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक उत्सव साजरा न करता विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. रक्तदान शिबिरासह विविध उपक्रमांमुळे कर्जत शहरात गुंड कॉलनीचा राजा मित्र मंडळाची चर्चा सुरू आहे. एकी, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावातून गणेशोत्सव साजरा करत मंडळाने कर्जत तालुक्यासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी आणि रक्तदानातून माणुसकीचा संदेश देणाऱ्या गुंड कॉलनीचा राजा मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
ही बातमी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा!
सत्य व पडताळणी झालेल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा






