गणेशोत्सवात डीजेला बंदी; पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे मिरजगाव पोलिसांचे आवाहन!

ठळक महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights)
गणेशोत्सव काळात मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत डीजेला बंदी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन डीजे व ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा गणेश मंडळ अध्यक्ष, डीजे चालक व पोलीस पाटील यांची बैठक सार्वजनिक गणपती स्थापनेसाठी आवश्यक परवानग्या बंधनकारक शांततापूर्ण आणि ध्वनीप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
बोला रोखठोक संपादकीय पथकाद्वारे पडताळणी केली.
कर्जत (मिरजगाव) : आगामी गणेशोत्सव शांततेत व ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरणात पार पडावा, यासाठी मिरजगाव पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश मंडळांचे अध्यक्ष, डीजे चालक तसेच पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस स्टेशन येथे दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव काळात कोणीही डीजेचा वापर करू नये, तसेच ध्वनीप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन मिरजगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी केले. तसेच डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या गणेश मंडळांवर ध्वनीप्रदूषण अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी गणपतीची स्थापना करताना आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणे बंधनकारक असल्याच्या सूचनाही पोलिसांकडून देण्यात आल्या. यावेळी अनेक गणेश मंडळाचे अध्यक्ष व गणेश भक्त उपस्थित होते.
ही बातमी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा!
सत्य व पडताळणी झालेल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा





