मुख्यपृष्ठ
मुख्य पान (Home)मागेBola RokhthokBola Rokhthok
मुख्य पानमहाराष्ट्रahilyanagar
महाराष्ट्रकर्जत
247 वाचक वाचत आहेत

राजेंद्र माने यांना जामीन मंजूर; प्रवीण ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला!

बो
संपादक गिरीधर जगताप
बोला रोखठोक ब्युरो
बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६·०५:५५ PM·1 मिनिटे वाचन
राजेंद्र माने यांना जामीन मंजूर; प्रवीण ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला!
📷फोटो सौजन्य: बोला रोखठोकप्रतिनिधिक छायाचित्र

ठळक महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights)

राजेंद्र काशिनाथ माने यांना जामीन मंजूर. प्रवीण जीवन ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला. अ‍ॅड. आकाश हळणवर यांनी राजेंद्र माने यांच्या वतीने युक्तिवाद केला. अमित राजेंद्र माने यांच्या वतीने अ‍ॅड. आकाश हळणवर व अ‍ॅड. सुमित पाटील यांनी युक्तिवाद केला. दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय.

✓ तथ्य पडताळणीकृत बातमी (Fact Checked)

बोला रोखठोक संपादकीय पथकाद्वारे पडताळणी केली.

बोला रोखठोक | कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत परिसरात २ ऑक्टोबर २०२६ रोजी माने आणि ढोकरीकर कुटुंबीयांमध्ये झालेल्या वादाचे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी करताना श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयाने दोन महत्त्वपूर्ण निर्णय दिले.राजेंद्र काशिनाथ माने यांना जामीन मंजूर करण्यात आला, तर प्रवीण जीवन ढोकरीकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

राजेंद्र काशिनाथ माने यांच्या वतीने अ‍ॅड. आकाश हाळणवर यांनी दि. १३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला होता. माने यांचा संबंधित घटनेशी थेट संबंध नसल्याचा मुद्दा त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. तसेच, संबंधित प्रकरणाला राजकीय वळण देऊन माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद त्यांच्या वतीने करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दि. १४ ऑक्टोबर रोजी राजेंद्र काशिनाथ माने यांचा जामीन अर्ज मंजूर केला. त्यानंतर त्यांची जामिनावर तुरुंगातून मुक्तता झाली.

दरम्यान, याच प्रकरणातील परस्परविरोधी गुन्ह्यात आरोपी प्रवीण जीवन ढोकरीकर यांच्या वकिलांच्या वतीने यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात मूळ फिर्यादी अमित राजेंद्र माने यांच्या वतीने अ‍ॅड. सुमित पाटील आणि अ‍ॅड. आकाश हाळणवर आणि यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला.

युक्तिवादादरम्यान, मूळ फिर्यादीला झालेल्या जखमांचे सविस्तर वर्णन न्यायालयासमोर मांडण्यात आले. तसेच, आरोपी प्रवीण जीवन ढोकरीकर यांना राजकीय पाठबळ असल्याचा मुद्दाही फिर्यादीच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला. आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्जात मांडलेल्या मुद्द्यांना फिर्यादीच्या वकिलांनी प्रत्युत्तर दिले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयाने दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रवीण जीवन ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणात एका आरोपीला जामीन मंजूर झाला, तर दुसऱ्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने श्रीगोंदा न्यायालयाच्या या निर्णयाकडे लक्ष वेधले जात आहे.

टॅग्ज:#महाराष्ट्र#ताज्या घडामोडी

ही बातमी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा!

सत्य व पडताळणी झालेल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा

या बातमीवर आपली प्रतिक्रिया नोंदवा:

पुढील बातमी सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!

वाचकांच्या प्रतिक्रिया (0)

पहिली प्रतिक्रिया द्या आणि या चर्चेत सहभागी व्हा!

आणखी महत्त्वाच्या घडामोडी

सर्व पहा →
सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!

सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!

📍 बारामतीवाचा →
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

📍 शिर्डीवाचा →
अ‍ॅड. अजित तापकीर यांची फौजदारी कायद्यात एलएल.एम. पदवीला गवसणी!

अ‍ॅड. अजित तापकीर यांची फौजदारी कायद्यात एलएल.एम. पदवीला गवसणी!

📍 पुणेवाचा →
गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!

गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!

📍 गोवावाचा →
MPSC राज्यसेवा परीक्षा २०२६: नवीन परीक्षा पद्धती आणि हॉल तिकीट अपडेट; उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना

MPSC राज्यसेवा परीक्षा २०२६: नवीन परीक्षा पद्धती आणि हॉल तिकीट अपडेट; उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना

📍 पुणे / मुंबईवाचा →
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पुढील हप्त्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; त्वरित करा ही कामे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पुढील हप्त्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; त्वरित करा ही कामे

📍 मुंबई / पुणेवाचा →
बोला रोखठोक लोगो

बोला रोखठोक

महाराष्ट्राचे ६०-शब्दांतील डिजिटल बातमीपत्र

WhatsApp ग्रुप२५k+

ताजी ब्रेकिंग थेट मिळवा

ग्रुप जॉईन करा →

मराठी बातम्या

  • 🚩महाराष्ट्र
  • 🏛️राजकारण
  • 🚨गुन्हेगारी
  • 📈बाजार व शेअर्स
  • 🎓शिक्षण व भरती
  • 💼नोकरी संदर्भ
  • 📄शासकीय योजना
  • 🏆क्रीडा जगत
  • 🎬मनोरंजन

प्रमुख जिल्हे

  • 🏰पुणे शहर
  • 🏭पिंपरी-चिंचवड
  • 🏙️मुंबई व ठाणे
  • 🏛️छ. संभाजीनगर
  • 🍊नागपूर
  • 🍇नाशिक
  • 🚩कोल्हापूर
  • 🕌अहिल्यानगर
  • ☀️सोलापूर
  • 👑सातारा

विशेष विभाग

  • ⚡६०-शब्दांत बातम्या
  • 📄शासकीय GR सोपी भाषा
  • 📰डिजिटल ई-पेपर
  • 🎬इन्स्टाग्राम रील्स
  • 🔴थेट प्रक्षेपण (Live)
  • 📺व्हिडिओ बुलेटिन
  • 🔖जतन केलेल्या बातम्या
  • 🔍शोध इंजिन (Search)

कार्यालय व संपर्क

📍 सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता, पुणे, महाराष्ट्र - ४११०३०.

✉️ bolarokhthok@gmail.com

सोशल मीडियावर फॉलो करा:

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे (All Maharashtra Districts)

३६ जिल्हे • थेट ६०-शब्दांतील बातम्या
🏰पुणे शहर🏭पिंपरी-चिंचवड👑सातारा🍇सांगली🚩कोल्हापूर☀️सोलापूर🌾बारामती🏔️मावळ🏞️हवेली🏙️मुंबई शहर🌆मुंबई उपनगर🏢ठाणे🌴पालघर⚓रायगड / नवी मुंबई🥭रत्नागिरी🌊सिंधुदुर्ग🍇नाशिक🕌अहिल्यानगर (अहमदनगर)🍌जळगाव🏞️धुळे🌄नंदुरबार🏛️छत्रपती संभाजीनगर⛩️धाराशिव (उस्मानाबाद)🌾जालना🎯बीड📚लातूर☬नांदेड🌱परभणी🌿हिंगोली🍊नागपूर🌳अमरावती🌾अकोला🚜यवतमाळ🕊️वर्धा🏞️बुलढाणा🌾वाशिम🌊भंडारा🌲गोंदिया🐯चंद्रपूर🎋गडचिरोली
जाहिरात व ब्रँड प्रमोशन•Brand Ads

ADVERTISE, BE REMEMBERED!

तुमच्या ब्रँड, व्यवसाय किंवा उपक्रमाची माहिती पोहोचवा थेट महाराष्ट्रातील लाखो वाचकांपर्यंत. डिजिटल बॅनर, प्रायोजित बातमी आणि सोशल मीडिया मोहिमेसाठी आजच संपर्क करा.

५०,०००+
मासिक वाचक
डिजिटल प्रेक्षक
३६ जिल्हे
सर्व जिल्हे
महाराष्ट्र कव्हरेज
२५k+
व्हॉट्सॲप वाचक
थेट कम्युनिटी
६०-शब्दांत प्रायोजित बातमीजिल्हास्तरीय टार्गेटिंगव्हॉट्सॲप ब्रॉडकास्टहाय-इम्पॅक्ट बॅनर
WhatsApp वर संपर्क करा
ईमेल पाठवा
आमच्याबद्दल•संपर्क•प्रायव्हसी पॉलिसी•अटी व शर्ती•अस्वीकरण•Sitemap•News Sitemap

© २०२६ बोला रोखठोक डिजिटल मीडिया. सर्व हक्क सुरक्षित.