राजेंद्र माने यांना जामीन मंजूर; प्रवीण ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला!

ठळक महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights)
राजेंद्र काशिनाथ माने यांना जामीन मंजूर. प्रवीण जीवन ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला. अॅड. आकाश हळणवर यांनी राजेंद्र माने यांच्या वतीने युक्तिवाद केला. अमित राजेंद्र माने यांच्या वतीने अॅड. आकाश हळणवर व अॅड. सुमित पाटील यांनी युक्तिवाद केला. दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय.
बोला रोखठोक संपादकीय पथकाद्वारे पडताळणी केली.
बोला रोखठोक | कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत परिसरात २ ऑक्टोबर २०२६ रोजी माने आणि ढोकरीकर कुटुंबीयांमध्ये झालेल्या वादाचे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी करताना श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयाने दोन महत्त्वपूर्ण निर्णय दिले.राजेंद्र काशिनाथ माने यांना जामीन मंजूर करण्यात आला, तर प्रवीण जीवन ढोकरीकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
राजेंद्र काशिनाथ माने यांच्या वतीने अॅड. आकाश हाळणवर यांनी दि. १३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला होता. माने यांचा संबंधित घटनेशी थेट संबंध नसल्याचा मुद्दा त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. तसेच, संबंधित प्रकरणाला राजकीय वळण देऊन माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद त्यांच्या वतीने करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दि. १४ ऑक्टोबर रोजी राजेंद्र काशिनाथ माने यांचा जामीन अर्ज मंजूर केला. त्यानंतर त्यांची जामिनावर तुरुंगातून मुक्तता झाली.
दरम्यान, याच प्रकरणातील परस्परविरोधी गुन्ह्यात आरोपी प्रवीण जीवन ढोकरीकर यांच्या वकिलांच्या वतीने यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात मूळ फिर्यादी अमित राजेंद्र माने यांच्या वतीने अॅड. सुमित पाटील आणि अॅड. आकाश हाळणवर आणि यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला.
युक्तिवादादरम्यान, मूळ फिर्यादीला झालेल्या जखमांचे सविस्तर वर्णन न्यायालयासमोर मांडण्यात आले. तसेच, आरोपी प्रवीण जीवन ढोकरीकर यांना राजकीय पाठबळ असल्याचा मुद्दाही फिर्यादीच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला. आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्जात मांडलेल्या मुद्द्यांना फिर्यादीच्या वकिलांनी प्रत्युत्तर दिले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयाने दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रवीण जीवन ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणात एका आरोपीला जामीन मंजूर झाला, तर दुसऱ्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने श्रीगोंदा न्यायालयाच्या या निर्णयाकडे लक्ष वेधले जात आहे.
ही बातमी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा!
सत्य व पडताळणी झालेल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा




