मुख्यपृष्ठ
मुख्य पान (Home)मागेBola RokhthokBola Rokhthok
मुख्य पानमहाराष्ट्रahilyanagar
महाराष्ट्रजामखेड
23 वाचक वाचत आहेत

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा द्या; नियम-कायद्यांचे कारण सांगून गैरसमज पसरवू नका! -पालकमंत्री राधाकृष्ण विखे

बो
संपादक गिरीधर जगताप
बोला रोखठोक ब्युरो
गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६·११:१६ AM·2 मिनिटे वाचन
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा द्या; नियम-कायद्यांचे कारण सांगून गैरसमज पसरवू नका! -पालकमंत्री राधाकृष्ण विखे
📷फोटो सौजन्य: संपादक गिरीधर जगतापप्रतिनिधिक छायाचित्र

ठळक महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights)

कुकडीच्या आवर्तनातून जामखेडला पाणी देण्याबाबत विचार – जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही. शेतकऱ्यांशी संवेदनशीलतेने वागा – नियम-कायद्यांचे कारण सांगून गैरसमज पसरवू नका. पीकनुकसानीचे पंचनामे करा – मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये. टँकर नियोजनात हलगर्जीपणा नको – ग्रामसेवक व तलाठ्यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश. जनावरांसाठी चारा व पाण्याचे नियोजन – कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने काम करावे. अतिवृष्टीग्रस्त कामांसाठी निधी – बंधारे, मोहरी तलावाचा सांडवा आणि कुकडी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केल्याची माहिती.

✓ तथ्य पडताळणीकृत बातमी (Fact Checked)

बोला रोखठोक संपादकीय पथकाद्वारे पडताळणी केली.

जामखेड, दि. १ (प्रतिनिधी) : जामखेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना प्रशासकीय यंत्रणेने अतिशय संवेदनशीलतेने काम करावे. नियम आणि कायद्यांची कारणे सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करू नयेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, जामखेड तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत महत्त्वपूर्ण निर्णयांची कार्यवाही सुरू आहे. कुकडी धरण समूहातील पाण्याचा लाभ आवर्तनाच्या माध्यमातून देण्याबाबत निश्चित विचार केला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री विखे पाटील यांनी जामखेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच आरणगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.

दुष्काळी परिस्थितीच्या उपाययोजनांचा आढावा

कर्जत-जामखेड तालुक्यांतील दुष्काळी भागातील समस्या जाणून घेण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पाणीटंचाई, चारा उपलब्धता, पीकनुकसान, पीक विमा, वीजपुरवठा आणि जलजीवन मिशनच्या योजनांसह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगतीने निर्णय घेतले आहेत. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याबरोबरच जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करणे प्राधान्याचे आहे. तालुक्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

पंचनामे आणि टँकर नियोजनात हलगर्जीपणा नको

दुष्काळी परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, असे स्पष्ट करत मंत्री विखे पाटील यांनी पंचनामे आणि मदतीच्या प्रक्रियेत गांभीर्याने काम करण्याचे निर्देश दिले. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी उपस्थित राहणे सक्तीचे करावे, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करावे. बैठकीत चुकीची माहिती देऊ नये. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊ देऊ नका, अन्यथा कारवाई करण्याची वेळ आणू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

अतिवृष्टीग्रस्त कामांसाठी निधी उपलब्ध

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कवडगाव, चौंडी आणि जवळा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामे, मोहरी तलावाचा सांडवा तसेच कुकडी कालव्यांच्या नुकसानग्रस्त भागांच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

जामखेडला अतिरिक्त पाणी देण्याची मागणी

सभापती प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेत कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी जामखेड तालुक्याला मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने आवश्यक निर्णय घेतले असून, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे त्यांनी नमूद केले.

पीक विमा, वीजपुरवठा आणि जलजीवन मिशनच्या योजनांबाबत प्रशासनाने अधिक गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचेही राम शिंदे यांनी सांगितले. यावेळी आमदार सुनील कर्जतकर यांनी विविध सूचना मांडल्या. अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, वीज वितरण कंपनीचे रमेश पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे, प्रांताधिकारी नितीन पाटील, विनायक देशमुख, अंबादास पिसाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

टॅग्ज:#महाराष्ट्र#ताज्या घडामोडी

ही बातमी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा!

सत्य व पडताळणी झालेल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा

या बातमीवर आपली प्रतिक्रिया नोंदवा:

मागील बातमीकर्जतचा प्रारूप विकास आराखडा रद्द करा; नितीन तोरडमलांची मागणी!पुढील बातमी मोठ्या धरणांच्या लाभक्षेत्राचा होणार सामाजिक-आर्थिक सर्व्हे; विखे पाटलांची मोठी घोषणा!

वाचकांच्या प्रतिक्रिया (0)

पहिली प्रतिक्रिया द्या आणि या चर्चेत सहभागी व्हा!

आणखी महत्त्वाच्या घडामोडी

सर्व पहा →
भाजप गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज वैध; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा!

भाजप गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज वैध; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा!

📍 सांगलीवाचा →
राजेंद्र माने यांना जामीन मंजूर; प्रवीण ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला!

राजेंद्र माने यांना जामीन मंजूर; प्रवीण ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला!

📍 कर्जतवाचा →
सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!

सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!

📍 बारामतीवाचा →
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

📍 शिर्डीवाचा →
अ‍ॅड. अजित तापकीर यांची फौजदारी कायद्यात एलएल.एम. पदवीला गवसणी!

अ‍ॅड. अजित तापकीर यांची फौजदारी कायद्यात एलएल.एम. पदवीला गवसणी!

📍 पुणेवाचा →
गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!

गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!

📍 गोवावाचा →
बोला रोखठोक लोगो

बोला रोखठोक

महाराष्ट्राचे ६०-शब्दांतील डिजिटल बातमीपत्र

WhatsApp ग्रुप२५k+

ताजी ब्रेकिंग थेट मिळवा

ग्रुप जॉईन करा →

मराठी बातम्या

  • 🚩महाराष्ट्र
  • 🏛️राजकारण
  • 🚨गुन्हेगारी
  • 📈बाजार व शेअर्स
  • 🎓शिक्षण व भरती
  • 💼नोकरी संदर्भ
  • 📄शासकीय योजना
  • 🏆क्रीडा जगत
  • 🎬मनोरंजन

प्रमुख जिल्हे

  • 🏰पुणे शहर
  • 🏭पिंपरी-चिंचवड
  • 🏙️मुंबई व ठाणे
  • 🏛️छ. संभाजीनगर
  • 🍊नागपूर
  • 🍇नाशिक
  • 🚩कोल्हापूर
  • 🕌अहिल्यानगर
  • ☀️सोलापूर
  • 👑सातारा

विशेष विभाग

  • ⚡६०-शब्दांत बातम्या
  • 📄शासकीय GR सोपी भाषा
  • 📰डिजिटल ई-पेपर
  • 🎬इन्स्टाग्राम रील्स
  • 🔴थेट प्रक्षेपण (Live)
  • 📺व्हिडिओ बुलेटिन
  • 🔖जतन केलेल्या बातम्या
  • 🔍शोध इंजिन (Search)

कार्यालय व संपर्क

📍 सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता, पुणे, महाराष्ट्र - ४११०३०.

✉️ bolarokhthok@gmail.com

सोशल मीडियावर फॉलो करा:

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे (All Maharashtra Districts)

३६ जिल्हे • थेट ६०-शब्दांतील बातम्या
🏰पुणे शहर🏭पिंपरी-चिंचवड👑सातारा🍇सांगली🚩कोल्हापूर☀️सोलापूर🌾बारामती🏔️मावळ🏞️हवेली🏙️मुंबई शहर🌆मुंबई उपनगर🏢ठाणे🌴पालघर⚓रायगड / नवी मुंबई🥭रत्नागिरी🌊सिंधुदुर्ग🍇नाशिक🕌अहिल्यानगर (अहमदनगर)🍌जळगाव🏞️धुळे🌄नंदुरबार🏛️छत्रपती संभाजीनगर⛩️धाराशिव (उस्मानाबाद)🌾जालना🎯बीड📚लातूर☬नांदेड🌱परभणी🌿हिंगोली🍊नागपूर🌳अमरावती🌾अकोला🚜यवतमाळ🕊️वर्धा🏞️बुलढाणा🌾वाशिम🌊भंडारा🌲गोंदिया🐯चंद्रपूर🎋गडचिरोली
जाहिरात व ब्रँड प्रमोशन•Brand Ads

ADVERTISE, BE REMEMBERED!

तुमच्या ब्रँड, व्यवसाय किंवा उपक्रमाची माहिती पोहोचवा थेट महाराष्ट्रातील लाखो वाचकांपर्यंत. डिजिटल बॅनर, प्रायोजित बातमी आणि सोशल मीडिया मोहिमेसाठी आजच संपर्क करा.

५०,०००+
मासिक वाचक
डिजिटल प्रेक्षक
३६ जिल्हे
सर्व जिल्हे
महाराष्ट्र कव्हरेज
२५k+
व्हॉट्सॲप वाचक
थेट कम्युनिटी
६०-शब्दांत प्रायोजित बातमीजिल्हास्तरीय टार्गेटिंगव्हॉट्सॲप ब्रॉडकास्टहाय-इम्पॅक्ट बॅनर
WhatsApp वर संपर्क करा
ईमेल पाठवा
आमच्याबद्दल•संपर्क•प्रायव्हसी पॉलिसी•अटी व शर्ती•अस्वीकरण•Sitemap•News Sitemap

© २०२६ बोला रोखठोक डिजिटल मीडिया. सर्व हक्क सुरक्षित.